#Corona
ऍड. केशव काळे यांचे दुःखद निधन……!

केज दि.१६ -शहरातील नामांकित वकील ऍड. केशव मारोतीराव काळे यांचे पुणे येथे कोरोना उपचारा दरम्यान निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ६० वर्षे होते.
केज शहरातील गुंड गल्ली भागात वास्तव्यास असणारे केशव काळे यांना कोरोना झाल्यानंतर उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते.परंतु मागच्या पंधरा दिवसांपासून कसलाच फरक न पडल्याने दि.१६ रोजी सायंकाळी ७ वाजता रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. ऍड. काळे हे तालुक्यात बापू नावाने परिचित होते.अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात पत्नी,आई, दोन मुलं, दोन मुली असा मोठा परिवार आहे.