आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात मृत्यु रोखण्यासाठी मिशन झिरो डेथ अभियान……! 

बीड दि.१८- राज्य शासनाने कोविड- १९ साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक २३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे.त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली असुन स्वतंत्ररित्या निर्गमीत करण्यात आलेली आहे.
       त्यानुसार बीड जिल्हा प्रशासना मार्फत कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही सुरु असुन विविध उपाययोजनांद्वारे कोविड- १९ साथरोगास आळा घालण्यासाठी आरोग्य विभाग काम करित आहे.
बीड जिल्हयामध्ये कोविड १९ आजाराच्या दुस-या साथीचा प्रसार वेगाने होत असुन दैनंदिन रुग्णसंख्या एक हजार पर्यंत जाऊन पोहचली आहे. सद्यस्थितीत जिल्हयाचा मृत्युदर २.१० इतका असुन काही तालुक्यांमध्ये तो ३ वा त्यापेक्षाही अधिक आहे. कोविड १९ रुग्णांचा वेळेत शोध घेवुन त्यांना वैद्यकीय सुविधा व औषधोपचार पुरविणे बरोबरच प्रशासकीय अथवा क्लिनीकल कारणामुळे होणारे मृत्यु कमी करणे व शुन्यावर आणणे ही जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता आहे यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे सहवासीत, ILI SARI रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीचा तात्काळ शोध घेवुन त्यांच्या RTPCR / Antigen Test करणे व पॉझिटिव्ह रुग्णांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींचा शोध घेणे, त्यांच्या वेळेवर टेस्ट करणे, त्यांना त्वरीत लक्षणानुसार औषधोपचार / वैद्यकीय सेवा देणे व त्यायोगे मृत्युचे प्रमाण कमी करुन ते शुन्यावर आणण्याच्या दृष्टीने “मिशन झिरो डेथ” (कोविड- १९ रोगाचे उशिरा निदान झालेमुळे होणारे मृत्यु कमी करणे / शुन्यावर आणणे ) कालबध्द मिशन हाती घेण्यात येत आहे. मिशनची उद्दिष्टे व स्वरुप खालील प्रमाणे आहेत.
             सदरील सर्वे मिशनचा प्रथम टप्पा १९ एप्रिल ते १० मे असा असणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत हद्यितील प्रत्येकी १०० घरांमागे दोन शिक्षक यांची नेमणुक करुन त्याच्या मार्फत सर्व शंभर कुटुंबे व कुटुंबातील सर्व सदस्य यांचे सर्वेक्षण करणे प्रतिदीन १०० या प्रमाणे सर्वेक्षण पुर्ण करणे व नंतर त्याच पध्दतीने आठवडयातुन दोन वेळा असे एकुण अभियान कालावधीत किमान तीन वेळा कुटुंबाचे सर्वेक्षण करणे.
                   सर्वेक्षणामध्ये ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी, हगवण, थकवा इ. कोविड सदृश्य इत्यादी लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे. कुटूंबातील सर्व सदस्यांचे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणे व त्याची नोंद घेणे. कुटूंबातील लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींचा तपशील संकलीत करणे. कुटूंबामध्ये इतर आजार असलेल्या (कोमॉर्बीड) असलेल्या व्यक्ती उदा मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी व्यक्ती नियमितपणे त्या त्या आजाराची औषधे घेतात का याची खात्री करावी, घेत नसल्यास याबाबत नियमित औषधोपचार घेणेचे महत्व पटवून देवून आवश्यक पाठपुरावा करणे.  सर्वेदरम्यान ६० वर्षे वयांवरील व्यक्तींकडे विशेष लक्ष देवून आवश्यकतेनुसार कोविड १९ चाचणीसाठी संदर्भीत करावे. सर्वेदरम्यान रक्तातील ऑक्सिजन पातळी ९५% पेक्षा कमी दिसल्यास अथवा कोविड सदृश्य लक्षणे असल्यास संबंधित व्यक्तीस त्वरीत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड- १९ तपासणीसाठी पाठवावे कोविड १९ लक्षणे असणा-या व ऑक्सिजन पातळी कमी असणा-या रुग्णांची चाचणी होणेसाठी आवश्यक पाठपुरावा करणे तसेच सर्व नागरिकांना वेळेत चाचणी करुन घेतल्यास रुग्णाचे मृत्युचे प्रमाण कमी होवू शकते हे पटवून सांगणे.
                 तसेच मिशन कालावधीत गावातील खाजगी दवाखाने / नर्संग होम येथे कोविड १९ सदृश्य लक्षणांबाबत उपचार घेणा-या रुग्णांची दैनंदिन माहिती घेवून अश्या सर्व रुग्णांची कोविड १९ चाचणी करुन घेणेबाबत पाठपुरावा करणे. ९. गावात कंटेनमेन्ट झोन घोषित झाला असल्यास तेथील प्रत्येक कुटूंबातील किमान एका सदस्याची कोविड १९ चाचणी करून घेणे बाबत तालुका आरोग्य व वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ल्याने नियोजन करणे. सर्वेक्षण करणारे पथक १०० कुटूंबामागे दोन शिक्षक यांची गट विकास अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्या मदतीने नेमणुक करणे, तसेच वरील उद्यिष्टापैकी क्रमांक ८ व ९ ची जबाबदारी ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका यांनी पार पाडणे याबाबतचे आदेश गट विकास अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मदतीने काढणे, तसेच उद्यिष्ट क्रमांक १ ते ७ साठी जवळच्या उपकेंद्रातील MPW यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करणे.
                   अहवाल संकलन सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अहवाल रोजच्या रोज पंचायत समितीकडे सादर करणे तालुका पातळीवर विस्तार अधिकारी पंचायत व विस्तार अधिकारी आरोग्य यांनी हे अहवाल संकलीत करुन तालुक्यांचा एकत्रित अहवाल जिल्हा परिषद आरोग्य विभागास सादर करावा तालुका पातळीवर या अभियानाचे नियोजन करण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची राहील तसेच सर्व तालुक्यांचे अहवाल एकत्रित करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्याची जबाबदारी ही जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांची राहील. मिशन कालावधीत सर्वेसाठी नियुक्त शिक्षक (४५ वर्षे वयाच्या आतील )/ कर्मचारी यांना तालुका आरोग्य अधिकारी यांनी पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावेत, तसेच सर्वेदरम्यान
घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक बाबींचे योग्य प्रशिक्षण द्यावे. मिशन कालावधीत टेस्टींग, लसीकरण वाढवुन जनजागृतीद्वारे व योग्य उपाययोजनांद्वारे कोविड १९ मृत्युदर शुन्यावर आणणा-या गावांना तसेच ग्रामपंचायतीतील पदाधिकारी / अधिकारी/ कर्मचारी यांना विशेष प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल.
              दरम्यान गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी मिशनचे नियम व अमंलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे सूचित करण्यात आले असून  उपरोक्त आदेशाची अवाज्ञा करणा-या व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता १८९० (४५) याच्या कलम १८८ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानन्यात येईल आणि इतर कलमासह दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.
बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आता बीड जिल्ह्यातील अत्यावश्‍यक सेवांसाठी उद्यापासून (दि.१९) सेवा देण्याचा वेळ कमी केला आहे.
जिल्हाधिकारी यांनी रविवारी (दि.१८) काढलेले नवीन आदेशात किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने, बेकरी या दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुट दिली आहे. यासह केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायंकाळी पाच ते सात पर्यंत विक्री करण्यात येणार आहे. या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close