#Curfew
केज तालुक्यातील ‘या’ दोन गावात उद्या रात्री पासून जनता कर्फ्यू………!
तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी दिली भेट.....!
केज दि. २० – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे तालुक्यातील युसुफवडगाव, सोनी जवळा या गावांत रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामूळे ही साखळी तोडण्यासाठी गावकऱ्यांनी सोनी जवळा येथे आठ दिवस तर युसुफ वडगाव येथे दहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे
दरम्यान सोनीजवळा गावात विना मास्क फिरणाऱ्या कडून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तर आता कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या दोन्ही गावांना तहसीलदार दुलाजी मेंडके, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी गावाला भेट देऊन नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. यावेळी सोनीजवळा येथे सरपंच मुकुंद गायकवाड, ग्रामविकास अधिकारी आर.व्ही.वरपे तर युसुफ वडगाव येथे पंचायत समिती सदस्य उमाकांत भुसारी, सचिन जावळे, अरुण राऊत, सुरेश चोपणे, रुदुनाना गडकर, शिवराज थळकरी, ग्रामसेवक, पोलीस कॉ. घोरपडे, खनपटे आदींनी प्रत्यक्ष गावात फेरी मारून व्यावसायिकांना सूचना दिल्या. तर ग्रामस्थांनी सहकार्य करण्याची विनंती स्थानिक प्रशासनाने केली.