क्राइम
भावानेच केला बहिणीचा खून……!केज तालुक्यातील घटना……!
केज दि.२१ – आईला पाडव्यानिमित्त भेटायला आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने खून केल्याची घटना तालुक्यातील बोरगाव येथे मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास उघडकीस आली. केज पोलिसात भावासह त्याच्या मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथून आईला केज तालुक्यातील बोरगाव येथे आईला पाडव्या च्या सना निमित्त शितल लक्ष्मण चौधरी ही तिच्या मुलीला घेऊन बोरगाव येथे आली होती. मात्र तिचा मंगळवारी मध्यरात्री तिचा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा. बोरगाव यांनी अज्ञात कारणावरून बहिणीच्या डोक्यात हत्याराने वार
करून तिचा खून केला. मयत महिलेचा
चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे याने दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा. बोरगाव यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या सह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली . या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करत आहेत. दरम्यान भावाने बहिणीचा खून का केला ? हे मात्र स्पष्ट झालेले नाही.