#Corona

घाबरून न जाता निरीक्षणात्मक पद्धतीने कोरोनावर मात करा – डॉ.मृत्युंजय महेंद्रकर

बीड दि.26 – कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरू आहे.शहरांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला आहे. आजारापेक्षा लोक भीतीनेच जास्त खचत आहेत. मात्र मनात कसल्याही प्रकारची भीती न बाळगता निरीक्षणात्मक दृष्टीने कोरोनाचा सामना केला तर आपण त्यावर मात करू शकतो, असे आवाहन नांदेड येथील छातीरोग तज्ज्ञ डॉ. मृत्युंजय महेंद्रकर यांनी व्यक्त केले.
             सध्या सोशेल मीडियामध्ये डॉ. महेंद्रकर यांचा विडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी सौम्य लक्षणे असलेल्या उदा. ताप, अंगदुखी, डोकेदुखी यापैकी कांही असेल तर लगेच घाबरून न जाता 6 मिनिटे चालून आपली ऑक्सिजन लेवल तपासावी. आणि ऑक्सिजन लेवल 3 ने खाली येत असेल तर याचा अर्थ तुमच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे त्यामुळे आपण तात्काळ कोरोना टेस्ट करून घ्यावी. व लागलीच सिटी स्कॅन करून घ्यावे. तसेच सदरील लक्षणे दिसून आली तर सांगितलेल्या गोळ्या सुरू करून सीबीसी, सीआरपी, सिरम, शुगर या चार रक्ताच्या तपासण्या करून कोरोना टेस्ट करून घ्यावी. सौम्य लक्षणे असतील तर Tab ivermectin 12 mg daily once for 5 days
Tab Doxycycline 100 mg twice daily for 5 days ही औषधे घेतली तर प्राथमिक स्थितीत आराम मिळू शकतो असेही त्यांनी सक्रीय न्युज शी बोलताना सांगितले. मात्र जास्त त्रास असेल, इतर कांही गंभीर आजार असतील तर तात्काळ कोरोना टेस्ट करून योग्य उपचार घ्यावेत असेही त्यांनी सांगितले.
            दरम्यान आतापर्यंत त्यांनी सौम्य लक्षणे असलेल्या किमान तीन ते चार हजार रुग्णांवर उपचार केले असून बहुतांश रुग्ण प्राथमिक अवस्थेतच बरे झाले आहेत. त्यापैकी एका कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाचे मनोगत सक्रीय न्युज च्या माध्यमातून देत आहोत………!
  पंधरा दिवसाच्या प्रचंड धावपळीनंतर अखेर मी व माझे सर्व कुटुंब बाधित झालो होतो. पंधरा दिवसापूर्वी मला लक्षणे जाणवताच  माझे फॅमिली डॉ. विवेक वाघमारे व डॉ. मृत्युंजय महिंद्रकर नांदेड यांनी मला कोर्स सुरु करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेला डोस नियमित घेतला केवळ 360 रु. (एक व्यक्ती ) मी व माझे कुटुंब घरीच ( home isolation ) ठणठणीत झालोत. कसलीही इतर टेस्ट नाही (ब्लड,सिटी स्कॅन) यापैकी काहीच नाही. मला आपणास सांगायचे आहे प्रत्येकाला एक ना एक दिवस यामधून जाणे आहे परिस्थिती रोज भयावह बनत चालली आहे त्यामूळे धीरोदत्तपणे सामना करणे गरजेचे आहे.
       मित्रहो खरं तर मी Asthemetic Patient , Major csf  leakage (मेंदूतील रक्तस्त्राव व मेंदूकडे जाणारी नस ) four operation at Life Line Hospital & Noble Hospital Pune असे असताना सुद्धा मी सध्या ठणठणीत आहे.माझे सहकारी हंबीर सर व डॉ. विवेक वाघमारे हे माझ्या सतत संपर्कात होतें. त्यांना या सर्व गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी चक्क घरी येऊन पाहणी केली व म्हणाले, खरच सर…..  आश्चर्य आहे…..!
               असो यासाठी एवढेच सांगणे आहे परिस्थिती अत्यंत वाईट आहे, काळजी घ्या, सुरक्षित रहा.माझ्या कुटुंबाची काळजी मीच घेतली. Oximeter, thermometer घेऊन रोज सकाळ, संध्याकाळ तपासणी केली त्यामुळे मी बिनधास्त होतो. तसेच मी एक महिन्यापूर्वी कोव्हिडं  लसीचा पहिला डोस घेतला होता व मला कोव्हिड लसी मुळे नक्कीच संरक्षण मिळाले. म्हणून आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी लस तात्काळ घ्यावी ही माझी आपणास नम्र विनंती. मी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठीच civil हॉस्पिटल मध्ये निघालो होतो परंतु कणकण जाणवली व RTPCR टेस्ट केली व मी positive आलो. आज मी व माझे सर्व कुटुंब Negative आहोत व ठणठणीत आहोत. खूप खूप धन्यवाद डॉ. विवेक, डॉ. मृत्युंजय
महिंद्रकर साहेब  व हंबीर सर………!
            अनंत काळे (स.शि.
          परभणी

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close