#Vaccination

ऍप वर नोंदणी केली तरच मिळणार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस…….!

नवी दिल्ली दि.26 – गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याची नोंदणी 28 एप्रिल पासून  को-विन अँपवर करता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र लस घेण्यासाठी लोकांना को-विन ॲपवर नावाची नोंदणी करावी लागेल. लस घेण्याची वेळ व दिवस निश्चित केला जाईल. को-विन ॲपवर नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या नाकरिकांना लस दिली जाणार नाही.

लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. त्यामुळे तुम्हाला लस घ्यायची असेल तर आधी को-विन ॲपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.18 वर्षावरील लसीकरिता पात्र नागरिकांना को-विन अँप वर नाव नोंदवता येईल. को-विन अॅप वर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर एसएमएसदारे त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येईल.नोंदणी पूर्ण करण्यासाठी व्हेरिफाय बटन वर क्लिक करावं लागेल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला इतर महत्वाची माहिती विचारण्यात येईल. यात प्रामुख्याने तुमचं नाव, जन्म तारीख, लिंग, ओळखपत्र प्रकार इत्यादींचा समावेश असेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर नोंदणीवर बटन वर क्लीक करा.

दरम्यान एकदा नोंदणी झाली की लसीकरणा संदर्भातील सर्व महत्वाची माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येईल. तसेच लस घ्यायची असल्यास याकरता लसीकरण केंद्र शोधण्यात गूगल सर्च आणि मॅप्सची मदत तुम्हाला घेता येणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close