#Lockdown

राज्यात 15 मे पर्यंतच्या लॉकडाउन ची अधिकृत घोषणा……!

मुंबई दि.२९ –  राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत, असंही राज्य सरकारनं आदेशात म्हटलं आहे. आता लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे.

नियमावलीनुसार 15 मेपर्यंतच्या लॉकडाऊन काळात मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल. सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत. लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

दरम्यान 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन, 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन, सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद, सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद, राज्यात जिल्हा बंदी लागू, अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद, सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी, खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी, सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार, एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार, अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा, खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड, सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती, अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार, लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी, लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार, बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार, होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक, कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार, फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार अशी नियमावली लागू करण्यात आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close