केज तालुक्यातील एका गावातील २७ वर्षीय महिला ही २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शेतात जात असताना आरोपी प्रशांत राजाभाऊ सोनवणे ( रा. मस्साजोग ता. केज ) याने तिचा पाठलाग केला. गावालगतच्या नदीजवळ तिला गाठून जवळपास कोणी नसल्याची संधी साधून वाईट हेतूने तिचा उजवा हात धरला व लज्जास्पद बोलून छेडछाड करू लागला. महिलेने विरोध करीत माझ्या घरी सांगते असे म्हणताच आरोपी प्रशांत सोनवणे याने पीडित महिलेच्या गालात चापट मारून तू कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत सोनवणे याच्याविरुध्द केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.