क्राइम
केज तालुक्यात मटका बुक्कीवर पोलिसांची धाड तर अन्य एका घटनेत महिलेचा विनयभंग……!
डी डी बनसोडे
April 30, 2021
केज दि.३० – तालुक्यातील येवता येथे चालू असलेल्या मटका बुक्कीवर डी बी शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकून एकास ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील येवता येथे दि. २९ एप्रिल रोजी कल्याण नावाचा जुगार मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच डी बी शाखेचे दिलीप गित्ते यांनी दुपारी ३:४५ वा. च्या दरम्यान धाड टाकली. यात नगदी ११३० रु. तसेच मटक्याच्या साहित्यासह सिताराम सोपान सरवदे याला ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी दिलीप गिते यांच्या तक्रारी वरून सिताराम सोपान सरवदे यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास बाळकृष्ण मुंडे हे करीत आहेत.
कोर्टातील दावा काढून घे म्हणत महिलेचा विनयभंग
कोर्टात सुरू असलेला दावा काढून घे; म्हणून केज तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि.३० एप्रिल रोजी सकाळी १०:०० वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिलेचा तिच्या घरा समोर असताना एकाने कोर्टात दिलेल्या दावा काढून घे, असे म्हणून विनयभंग केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत शिवीगााळ केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस कॉन्स्टेबल दिनकर पुरी हे पुढील तपास करीत आहेत.