आपला जिल्हा
वीज अंगावर पडल्याने दोन महिलांचा मृत्यू……..!
बीड दि.२ – रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने सुरु झालेल्या पावसामध्ये वीज पडून नेकनूर (लोखंडे वस्ती ) येथे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, ती आठ महिन्याची गर्भवती होती .
रविवार (दि. २ मे ) रोजी दुपारी तीनच्या सुमारास नेकनूर मध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा हा पाऊस जवळपास अर्धा तास सुरू होता. या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. तर यामध्ये नेकनूर येथील लोखंडे वस्तीवर राधाबाई दिपक लोखंडे (३०) या महिलेचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. राधाबाई आपल्या नातेवाईकांसह वादळवारे सुटल्यामुळे घराकडे परतत होत्या. सदरील महिला ही आठ महिन्याची गर्भवती होती. या घटनेमुळे नेकनूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू प्रकरणी नेकनूर पो.स्टे.आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर अन्य एका घटनेत केज तालुक्यातील पिठ्ठी घाट येथेही दुपारी 5.30 वाजता वीज अंगावर पडून गीताबाई जगन्नाथ ठोंबरे या 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.