#Lockdown
केजमध्ये मोकाट फिरणाऱ्यांना अँटिजन चा धसका, बऱ्यापैकी वर्दळ झाली कमी…..!
केज दि.३ – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भवानी चौकात मागच्या तीन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या अँटीजन तपासणी मोहिमेचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. एरव्ही मोक्कार फिरणारे बाहेर निघण्याचे धाडस करत नसल्याने बऱ्यापैकी वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे.
केज शहरात 1 मे पासून छत्रपती शिवाजी महाराज व भवानी चौकात मोकाट फिरणाऱ्या लोकांची धरपकड करून अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.यामध्ये तीन दिवसांत सुमारे 25 नागरिक कोरोना बाधित आढळून आले असल्याने त्यांची रवानगी कोविड सेंटर ला करण्यात आली तर जे निगेटिव्ह आले त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम वगळता अन्य लोकांमध्ये दहशत निर्माण झाली असून ते घराच्या बाहेर निघण्याचे धाडस करत नसल्याने रस्त्यावरील गर्दी बऱ्यापैकी कमी झाली आहे व संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे.
दरम्यान आज (दि.३ ) रोजीही छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकूण 57 अँटीजन टेस्ट मध्ये 3 नागरिक बाधित आढळून आल्याने आजपर्यंत सुमारे 25 सुपर स्प्रेडर चा शोध लागला आहे. सदरील मोहिमे दरम्यान तहसीलदार दुलाजी मेंडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, डॉ. दत्तात्रय चाटे तसेच नगरपंचायत चे अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.