#Corona

मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईने केला अन्नत्याग, शेवटी दुर्दैवी अंत झाला……!

कळंब दि.६ –  कळंब तालुक्यातील अंदोरा याठिकाणी हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका तरुण मुलाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं आईनं अन्नत्याग केला होता. एकुलत्या एक मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्यानं विरह सहन करून न शकणाऱ्या मातेचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कळंब तालुक्यातील अंदोरा येथील एका युवकाला काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली. त्यामुळे त्याला बार्शी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची कोरोना चाचणी केली असता, आई आणि पत्नीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.बार्शी याठिकाणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या तरुणाचं अचानक निधन झालं. एकुलत्या एक मुलाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, उपचाराधिन असणाऱ्या आईनं अन्नत्याग केला

दरम्यान, अन्नत्याग केल्यामुळे संबंधित मातेची प्रकृती आणखी खालावली आणि त्यांचाही कोरोनामुळं मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील मायलेकराचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close