शेती

12 वा हप्ता जमा होण्यापूर्वी ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार…….!

8 / 100
मुंबई दि.५ – पीएम किसान योजनेचा हप्ता केव्हा खात्यामध्ये जमा होणार याची उत्सुकता ज्याप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये असते तोच उत्साह योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करुन दाखविणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांनी ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण केली तर योजनेचा लाभ कायम राहणार आहे. अन्यथा यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. (e-KYC) ‘ई-केवायसी’ साठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. नुकताच पीएम किसान योजनेतील 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण 12 हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे राहणार आहे. ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी 31 मे ही डेडलाईन होती. आता 31 जुलैपर्यंत ही वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे कीती शेतकरी याचा लाभ घेणे महत्वाचे आहे.
                   गेल्या 4 वर्षापासून पीएम कीसान योजना ही सुरु आहे. देशभरातील 10 कोटी 50 लाख शेकतरी हे या योजनेचा लाभ घेतात. मात्र, काही लाभार्थ्यांची माहिती अपडेट झालेली नाही. शिवाय अनेकजण हे पात्र नसतानाही योजनाचा लाभ घेतात. त्यामुळे योजनेमध्ये नियमितता यावी, पात्र शेतकऱ्यास योग्य मोबदला मिळावा हा योजनेचा उद्देश असताना यामध्ये अनियमितता आढळून येत असल्याने हे धोरण केंद्राने राबविण्यास सुरवात तर झाली आहे. त्यामुळे नेमके लाभार्थी किती हे देखील स्पष्ट होणार आहे.अल्प भूधारक किंवा अल्यल्प भुधारक शेतकऱ्यांना योजनेतील निधीचा उपयोग आहे. शिवाय सरकारचे धोरणही गरिब शेतकऱ्यांना याचा फायदा आहे. उद्देश आहे. मात्र, योजनेतील अनियमिततेमुळे कोट्यावधींचे नुकासान तर होतच आहे. शिवाय,अपात्र शेतकरी याचा लाभ घेत आहेत.त्यामुळे 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी e-KYC करणे बंधनकारक होते. असे असले तरी शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे केंद्राच्या आवाहनानंतरही शेतकरी हे दुर्लक्ष करीत असतील तर ते योजनेपासून वंचित राहणार आहेत.  31  जुलै ही अंतिम मुदत राहाणार आहे.
              ‘ई-केवायसी’ साठी प्रथम योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.तिथे तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.तिथे तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी बटणवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर OTP पुन्हा येईल जो 6 अंकांचा असेल. ते भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close