#Social
ऑक्सिगाणच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न…….!
केज दि.६ – बनेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा संचलित महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा येथे मानवलोक , अरोग्य विभाग व स्व.नारायणदादा प्रतिष्ठाणच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील निसर्गरम्य आदर्श कोविड केअर सेंटर म्हणुन या सेंटरचा उल्लेख केला जातो.सर्व सुविधांनी युक्त हे कोविड सेंटर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेषाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे व मानवलोकचे कार्यवाह अनिकेत भैय्या लोहीया यांच्या पुढाकारातुन सुरु करण्यात आले आहे.या कोविड केअर सेंटरमधील कोरोना पॉजीटीव्ह रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांच्या मनातील कोरोनाविषयी निर्माण झालेली भिती घालवण्यासाठी आज दि.७ मे शुक्रवार रोजी साय. ७ वाजता रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने आयोजित व तालमार्तंड प्रकाश बोरगावकर प्रस्तुत ऑक्सिगाण या संगीतमय कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमा दरम्यान डॉ.नरेंद्र काळे व ईंडीयन मेडीकल असोशीएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश ईंगोले हे रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.या पुर्वीही रोटरीने विविध कोविड सेंटरमध्ये ऑक्सिगाण या कार्यक्रमाचे आयोजन केले असुन रुग्णांकडुन अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
कार्यक्रमासाठी सुत्रसंचलक व गायक प्रकाश बोरगावकर यांची प्रस्तुती असुन डॉ.राजेश ईंगोले, द्वि आवाजाचा बादशहा प्रा.महादेव माने, प्रदीप चोपणे इत्यादी विविध हिंदी मराठी गीते सादर करणार आहेत.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन उपविभागीय अधिकारी शरद झाडके , अनिकेत लोहीया, सचिव डॉ.नरेंद्र काळे, रोटरीचे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे , तालुका आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे, विविध सामाजिक संकल्पना मांडुन प्रत्यक्षात उतरवणारे रो.संतोष मोहीते यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक हरीश्चंद्र हंडीबाग व महाराष्ट्र् परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान कोरोना बाधित रुग्ण हे आजारापेक्षा मानसिक तणावातच जास्त दिसून येतात. त्यामुळे योगा, प्राणायाम असे विविध उपक्रम तणावमुक्त करण्यासाठी प्रभावशाली ठरत असून संगीतमय कार्यक्रमातून सुद्धा रुग्णांचे मनोरंजन झाल्याने त्याचा नक्कीच सकारात्मक फायदा होणार आहे.