क्राइम

एक दिवसात कोरोना रुग्ण बरा केल्याचा दावा अंगलट, डॉक्टर वर गुन्हा दाखल……!

मुंबई दि.८ –  कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोना झाल्यावर 15 दिवसांनी त्याची प्राथमिक लक्षणे दिसतात त्यानंतर माणसाच्या अंगात त्याचे विषाणू पसरतात. त्यामुळे कोरोनातून बरं होण्यासाठी जवळजवळ 15 दिवस तरी क्वारंटाईन रहाव लागतं. तेव्हा कुठे कोरोनातून आपण सावरतो. मात्र अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळ असलेल्या वांगणीमधील खाजगी दवाखान्यातील डॉ. उमाशंकर गुप्ता यांनी अजब दावा केला आहे.

डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्याच्या महिला सहकारी डॉक्टर यांनी आपण एका दिवसात कोरोनाबाधित रूग्ण बरा केल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्या दवाखान्यातील गर्दी ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. मात्र या प्रकरणाची आरोग्य विभागाने दखल घेतली. डॉ. गुप्ता यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतीही परवानगी नसताना वांगणी येथे आपले क्लिनीक सुरू ठेवलं होतं. कोरोना काळात कोणतेही नियम न पाळता, मास्क न लावता, सुरक्षिततेची कोणतीही काळजी  घेत नसल्याचा ठपका ठेवत डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अंबरनाथचे डॉ. सुनील बनसोडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, डॉ. उमाशंकर गुप्ता यांच्यावर जरी गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना अटक केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. नागरिकांनी अशा डॉक्टरांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण अजुनही कोरोनावर मात करणारं औषध सापडलं नाही. त्यामुळे सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करा आणि काही लक्षणे आढळल्यास चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close