#Lockdown
बीड जिल्ह्यातील लॉकडाउन मध्ये थोडासा बदल……!

बीड दि.८ – बीड जिल्हयात बुधवारपर्यंत लॉकडाऊनचे नियम अधिक कठोर करण्यात आले होते. मात्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर किमान काही दिवस किराणा दुकान उघडण्यास परवानगी देण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी लॉकडाऊनच्या आदेशात काहीशी शिथिलता दिली असून आता मंगळवारी आणि बुधवारी जिल्ह्यातील किराणा, सुकामेवा, मिठाईची दुकाने त्या सोबतच चिकन,मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 10 या वेळात उघडता येणार आहेत. या व्यतिरीक्त पूर्वीचे सर्व निर्बंध मात्र कायम राहणार आहेत.