हवामान

केज तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली….…! 

केज दि.९ –  रविवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात दोन ठिकाणी विज पडल्याने शेतात बांधलेल्या गाई व म्हशीचा मृत्यू झाला आहे. तसेच आंब्याचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

                   केज शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी दोन वाजता जोरदार वारे व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले होते. तर शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. तर तालुक्यातील लाडेवडगाव येथील विष्णू ज्ञानोबा लाड यांच्या शेतात वीज पडल्याने गाय तर मोटेगाव येथील भाऊराव विठोबा पौळ यांची सर्वे नं. 9 मध्ये झाडाला बांधलेली म्हैस वीज पडून मरण पावली असल्याची माहिती नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांनी दिली आहे.
             दरम्यान अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतातील आंब्याचे व शेतातील मका पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close