शेतकऱ्यांसाठी 2250 कोटी रुपये मंजूर……!
नवी दिल्ली दि.१० – शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी 2250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे 2014-15 पासून सुरु करण्यात आलं आहे. फळबागांच्या विकासासाठी हे अभियान सुरु करण्यात आलं आहे. 2250 कोटी रुपयांचं वितरण विविध राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात येईल. 2019-20 मध्ये 320.77 दशलक्ष टन फळांचं विक्रमी उत्पादन 25.6 दशलक्ष हेक्टरवर घेण्यात आलं.
दरम्यान भारतात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मोठा फायदा झाला आहे. या अभियानामुळे भारतातील फळ उत्पादनात वाढ झाली आहे. 2014-15 ते 2019-20 मध्ये फळउत्पादनाची वाढ 9 टक्केवरुन 14 टक्क्यांवर गेली आहे. या अभियानाद्वारे उच्च प्रतीच्या फळांचं उत्पादन केलं जात आहे. तसेच केंद्र सरकारनं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्याअंतर्गत या अभियानाकडं पाहिलं जातं.