#Social
शिक्षक मैत्री प्रतिष्ठान अंबाजोगाई च्या वतीने कोविड सेंटरला विविध साहित्य भेट…….!
अंबाजोगाई दि. ११ (पांडुरंग केंद्रे) अंबाजोगाई येथील शिक्षक मैत्री प्रतिष्ठान च्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला विविध साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
यामध्ये रुग्ण वाहुन नेण्याच्या ट्राॅली, ४ आॅक्सीमिटर, ६ सिमेंट बाकडे, ४ पिण्याच्या पाण्याचे, मिनी वाॅटर कुलंट अशा प्रकारचे विविध साहित्य स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे व कोविड विभागाचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांना पंचायत समिती अंबाजोगाई गटविकास अधिकारी डॉ. संदिप घोणसीकर, गट शिक्षण अधिकारी चंदन कुलकर्णी, प्रा. प्रशांत जगताप, मु. अ. तानाजी देशमुख, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे मुख्य मार्गदर्शक विष्णू सरवदे, प्रतिष्ठान चे सदस्य वैजनाथ अंबाड, गणेश तरके, महादेव मिसाळ, महेश वेदपाठक, समाधान धिवार यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.
याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. राकेश जाधव, उपअधिक्षक डॉ. विश्वजित पवार, सर्जरी विभागाचे प्रमुख नितीन चाटे, न्याय वैद्यकीय शास्त्र विभागाचे डॉ. प्रमोद दोडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, उपाध्यक्ष अनुरथ बांडे, सचिव उमेश नाईक, कोषाध्यक्ष दत्ता देवकते, विनायक चव्हाण, बाळासाहेब माने, प्रताप चिंतामणीसह रुग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असणाऱ्या सदरील कार्याची रुपरेषा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी सांगितली. यापुर्वी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वे नंबर १७ येथील कोविड स्मशान भुमित मृतांच्या नातेवाईकांसाठी पाण्याची टाकी बसवण्यात आली. सदरील साहित्य भेट देण्यासाठी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व अंबाजोगाई परळी तालुक्यातील शिक्षक मित्रांचे योगदान लाभले.