#Vaccination
लसीकरणा संदर्भात बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून महत्वाची सूचना……!
बीड दि.11 – कोविड १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोविड लसीकरण सत्र तालुक्याच्या ठिकाणी सुरु असुन या वयोगटाकरीता दररोज २०० डोसेस याप्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे.
१८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचे सत्र धारुर, माजलगाव, परळी, वडवणी, शिरुर, बीड, येथे सुरु करण्यात आले होते.मात्र बुधवार दि. १२/५/२०२१ पासुन राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अंबाजोगाई, धारुर, माजलगाव,पाटोदा, वडवणी, शिरुर, बीड या ठिकाणी सुरु असलेले १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचे सत्र रदद करण्यात येत आहे. व शिल्लक असलेली कोव्हॅक्सीन लस ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांच्या दुस-या डोससाठी वापरण्यात येणार आहे.
दरम्यान कोव्हीशिल्ड लस असलेले बीड, केज, परळी, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई येथील लसीकरण सत्राकरीता दररोज दुपारी २ वाजता लस उपलब्ध असेपर्यंत स्लॉट ओपन केला जाईल, तरी १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांनी नोंदणी करुन अपॉइंटमेट नुसार लसीकरण करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले असुन कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.