लसीच्या संदर्भात कंपनींची मोठी घोषणा….!
मुंबई दि.१३ – कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात असताना अनेक राज्यात कोरोनाप्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अशावेळी ‘सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया’ आणि ‘भारत बायोटेक’ने आपल्या लसीकरणाच्या उत्पादनाचा रिपोर्ट केंद्र सरकारला दिला आहे. महत्वाची बाब म्हणजे ‘सीरम इंस्टीट्यूट’ने ऑगस्टपासून प्रत्येक महिन्यात 10 करोड कोविशील्ड व्हॅक्सीन उत्पादन करणार असल्याचे सांगितले आहे. सोबतच ‘भारत बायोटेक’ने प्रत्येक महिन्यात 7.8 करोड कोव्हॅक्सिन लस बनवणार असल्याचे सांगितले आहे. बुधवारी सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
‘भारत बायोटेक’चे डॉ. वी कृष्ण मोहन यांनी सरकारला माहिती दिली की, कोवॅक्सिनचे उत्पादन जुलै महिन्यात 3.32 करोड आणि ऑगस्ट महिन्यात 7.82 करोड होणार आहे. तसेच सप्टेंबरमध्ये देखील हा आकडा तसाच आहे. तसेच ‘सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया’ मधील सरकार आणि नियमांची माहिती प्रकार कुमार सिंह यांनी दिली आहे. कोविशील्डचे उत्पादन ऑगस्टमध्ये 10 करोड पर्यंत वाढणार आहे. सप्टेंबरपर्यंत हा आकडा तसाच आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा वाढत आहे. एका दिवसात 4205 कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत एकूण 2,54,197 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 3,48,421 नवे रूग्ण सापडले आहेत. हा एकूण आकडा 2,33,40,938 एवढा झाला आहे. तर देशातील अनेक राज्यात कोरोनाप्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत आहे.