शेती
लॉकडाऊन कालावधी कालावधी मध्ये कृषिसेवा केंद्रे चालु ठेवण्यास परवानगी द्या…….!
डी डी बनसोडे
May 13, 2021
लॉकडाऊन कालावधी कालावधी मध्ये कृषिसेवा केंद्रे चालु ठेवण्यास परवानगी द्या…….!
केज दि.१३ – शेतक-यांचा शेतीचा पेरणी हंगाम जवळ आलेला आहे. त्यांना शेतात पुर्व हंगामी कामे करण्यासाठी कृषिसेवा केंद्रे व इतर शेतीला आवश्यक असलेली दुकाने बंद असल्यामुळे अनंत अडचणीला तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांची शेतीची कामे अडून रहात आहेत. या मशागतीला उशीर झाल्यानंतर त्यांचे अतोनात नुकसान होणार आहे हे शासनाला परवडणारे नाही. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर प्रचंड प्रमाणात गर्दीचा सामना कृषि सेवा केंद्रे व इतर व्यापा-यांना करावा लागणार असुन कायदा व सुव्यवस्थेचा तसेच लोकांच्या आरोग्यचा प्रश्न उद्भवनार आहे.
त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करुन दिनांक 15/5/2021 ते 31/05/2021 या लॉकडावुन कालावधी मध्ये शेतीला पुरक असणा-या व्यवसायांना लॉकडावुनमधुन सुट देण्यात यावी अशी मागणी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, पशुपतीनाथ दांगट, समीर देशपांडे यांनी केज तालुका काँग्रेस च्या वतीने तहसीलदार दुलाजी मेंडके यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.