#Social
क्रांतिवीर आत्माराम बापू पाटील प्रतिष्ठानने नागरिकांना दिली सावली……!
केज दि.14 – लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होत असल्याचे लक्षात आल्यावरून व जनतेची मागणी लक्षात घेता केज येथील उपजिल्हा रुग्णालयात युवा नेते पशुपतीनाथ दांगट यांनी पुढाकार घेऊन क्रांतिवीर आत्माराम बापू पाटील प्रतिष्ठान मार्फ़त रुग्णालयातील लसीकरणाच्या समोरील बाजूस मंडप दिला आहे. त्यामुळे लस घेण्यास विलंब जरी लागला तरी किमान उन्हाचा त्रास जाणवणार नाही. तसेच जेथे टेस्टिंग केले जाते तेथे पण मंडपाचे काम टाकण्याचे काम सुरू असल्याने प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.