केज दि. १४ – पोटात दुखत असलेल्या रुग्णाला जेवण झाल्यानंतर तपासतो असे म्हणणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकास डोक्यात लोखंडी गज घालून जखमी केल्याची घटना तालुक्यातील जीवाचीवाडी येथे दि.१३ मे रोजी घडली आहे.
तालुक्यातील जिवाची वाडी येथे दि.१३ रोजी बाळू अच्युत चौरे हा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दादासाहेब लिंबाजी चौरे यांच्याकडे उपचारासाठी आला होता. परंतु दादासाहेब चौरे यांनी जेवण झाल्यानंतर पाहतो असे म्हणताच बाळू चौरे याने हातातील लोखंडी गज दादासाहेब यांच्या डोक्यात जखम केली. तर राजाभाऊ धोंडिबा चौरे व अनिल मधुकर चौरे या दोघांनी दादासाहेब यास दगडाने पाठीवर मारून मुक्कामार देत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
दादासाहेब चौरे यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरोधात केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.