पोपट दैवत घाटगे (रा.ढाकेफळ ता.केज) असे फसवणूक करणार्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. परशुराम नारायण सदावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोपट घाटगे याने ऊसतोडणीसाठी सात मजुर पुरवण्याचे सांगितल्यामुळे त्याच्या खात्यावर चार लाख दहा हजार रुपये पाठवले. याप्रकरणी करारनामाही करण्यात आलेला आहे. पंरतु पोपट घाटगे याने सात कोयते न पुरवता चारच कोयते पुरवले. आणि तेही निम्म्यावर काम सोडून पळून गेले. म्हणून 3 लाख 98 हजार रुपयांची फसवणुक केली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार श्रीराम काळे करत आहेत.