10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती……!

मुंबई दि.19 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केलीय. पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अपरेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 जून आहे.
अप्रेंटिस पदांसाठी पश्चिम रेल्वे (Western Railway) विभागात 3591 पदावंर अप्रेटिससाठी संधी देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे.तर उमेदवार दहावी उत्तीर्ण आवश्यक असून त्याशिवाय संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे.
कशी आहे निवड प्रक्रिया….?
उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
दरम्यान खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नसून इच्छुक उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या पश्चिम विभागाच्या वेबसाईट www.rrc-wr.com वर जाऊन अर्ज सादर करावेत.