#Lockdown

बीड जिल्ह्यात दररोज हजारावर खटले अन लाखोंचा दंड तरीही लोकांकडून नियमांचे उल्लंघन…..!

एकाच दिवशी 2353 खटले अन 620650 रुपयांचा दंड.....!  

बीड दि.21 – राज्यामध्ये कोव्हिड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियंत्रण ठेवणे करीता राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथरोग कायदा 1897, CRPC 144 कलम आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम लागू करण्यात आलेले आहेत. सध्याच्या काळात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत.
                 जमावबंदी आदेशाचे तसेच कोरोना (कोव्हिड-19) विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना मधील अधिसूचनाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई पोलीस प्रशासन करत आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच विनामास्क, विनाकारण फिरणारे, पोलीसांच्या सुचना न मानणारे, अवैध प्रवाशी वाहतुक करणारे, लॉकडाऊनच्या कालावधीत वाहनाच्या परवानगी पेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक करणारे, विना पास प्रवास करणारे, तसेच कडक निर्बंधाच्या आदेशामध्ये सुट दिलेले दुकाने वगळता जे दुकाने व आस्थापना सुरु ठेवतील अशा प्रकारच्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सिमांवर चेक पोस्ट व नाकाबंदी पाईंट लावण्यात आलेले आहेत. त्यासाठी आळीपाळीने पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 79 फिक्स नाकाबंदी पाईंट लावण्यात आले आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अचानक नाकाबंदी पाईंटस् नेमण्यात येत आहेत.
              दि.19/05/2021 रोजी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर 1113 खटले दाखल करून 3,53,050 रु. दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे. विनाकारण फिरणारे, पोलीसांच्या सुचना न मानणारे, अवैध प्रवाशी वाहतुक करणारे, लॉकडाऊनच्या कालावधीत वाहनाच्या परवानगी पेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक करणारे, अशा
1240 व्यक्तीवर जिल्ह्यात खटले दाखल करून 2,67,600/- रु. दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून दि. 15-05-2021 ते 25-05-2021 या कालावधीत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा.
नियमबाह्य प्रवासी वाहतुक करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. लसीकरणासाठी रूग्णालयात जाणारे व्यक्तींनी नियम पाळावेत.
                      नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर दाखल होणाऱ्या खटल्याची इंत्यभूत माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सदर व्यक्तींना चारित्र्य पडताळणी पासपोर्ट, नाहरकत प्रमाणपत्र, प्रशासनाकडून मिळविण्यास अडचणी येवू शकतात. तसेच आदेशामध्ये सुट दिलेले दुकाने वगळता जे इतर दुकाने व आस्थापना सुरु ठेवतील अशा व्यक्तींच्या दुकानांचे परवाने रद्द करणे व त्यांना आणि त्यांच्या कुंटूंबातील सदस्यांना पुढे अशा प्रकारच्या परवान्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळणार नाही, अशी तरतुद करण्याचे प्रशासनाच्या विचाराधिन आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close