#Lockdown
केज शहरात पुन्हा चौकात अँटिजन मोहीम……75 मध्ये 12…….!

केज दि.21 – कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे केज शहरात मागच्या पंधरा दिवसांपूर्वी चौकाचौकात अँटी जण टेस्ट मोहीम राबविण्यात आल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर आळा बसला होता आणि यातून बरेच सुपर स्प्रेडर पण टिपल्या गेले होते. मात्र नंतर कांही दिवसांसाठी सदरील मोहीम थंडावल्याने पुन्हा गर्दी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अँटी जण टेस्ट मोहीम सुरू करण्यात आली असून बरेच बाधित रुग्ण आढळून येत आहेत.
दि.20 रोजी सदरील मोहीम सुरू करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी एकूण 75 लोकांची टेस्ट करण्यात आली यामध्ये 12 रुग्ण बाधित आढळून आल्याने शुक्रवारी ही सदरील मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. पोलीस नाईक भोले आणि गृहरक्षक दलाचे जवान येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवून टेस्ट करून घेत आहेत.
