#Accident
मायलेकीचा होरपळून मृत्यू……!

माजलगाव दि.23 – शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव परिसरात रविवारी (दि.23) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.
शशिकला शंकरराव फफाळ (वय 65) व त्यांची मुलगी सखुबाई शंकरराव फफाळ (वय 45) अशी मयतांची नावे आहेत. त्या घरात झोपलेल्या होत्या यावेळी अचानक शॉर्टसर्किटने घरात आग लागली. या आगीत दोघींचाही होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंडगे, उपनिरीक्षक निलेश इधाटे, कर्मचारी राठोड यांनी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.