क्राइम

कोयत्याचे वार करून बापाचा खून, आठ दिवसातील बीड जिल्ह्यातील दुसरी घटना……!

बीड दि.२५ – मुलाने बापावर गोळ्या झाडून जखमी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच दारू पिऊन आईला शिवीगाळ करणाऱ्या बापाचा कोयत्याने सपासप वार करत मुलाने खून केला. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात शेतात आज मंगळवार (दि.२५) रोजी सकाळी घडली.पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.

किसन अंबादास तागड (वय ६० रा.पिंपळनेर ता.बीड) असे मयताचे नाव आहे. किसन हे दारू पिऊन सतत घरी वाद घालायचे, शिवीगाळ करायचे.या रागातून मुलगा लहू किसन तागड याने ते शेतात एकटे असल्याचा फायदा घेत कोयत्याने सपासप वार करत खून केला.

मुलानेच बापाचा खून केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक संतोष वाळके,पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि शरद भुतेकर, फौजदार सानप,सुरवसे वायकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पिंपळनेर पोलिस ठाण्यात मयताचे भाऊ रोहिदास अंबादास तागड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मागच्या आठ दिवसांपूर्वीच मुलाने बापावर गोळ्या झाडून जखमी केले होते.आणि त्यानंतर ही दुसरी घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली असून गुन्हेगारी वाढत चालली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close