आपला जिल्हाराजकीय

राहुल सोनवणे यांच्या दावेदारीवर शिक्कामोर्तब….!

12 / 100 SEO Score

केज दि.१३ – अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. केज तालुक्यामधील गट आणि गणांचे सुद्धा आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांची प्रबळ दावेदारी असणारा युसुफ वडगाव गट खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे राहुल सोनवणे यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून दावेदारी निश्चित झाली आहे.

         बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे हे मागच्या कित्येक वर्षांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. सर्वच स्तरातील नागरिकांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते राहुल सोनवणे यांनी जपले आहे. खासदार रजनीताई पाटील आणि माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक अडचणी सोडवण्याचे काम राहुल सोनवणे यांनी केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रभाव असल्याने युसुफ वडगाव सर्कल मधील बहुतांशी गावांमध्ये त्यांचा संपर्क दांडगा आहे.
                  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याअगोदरच कित्येक गावांमधून राहुल सोनवणे यांना लोक स्वतः गावांमध्ये बोलून यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपणच आम्हाला हवे आहात असा आग्रह ग्रामस्थांनी धरलेला आहे. आणि याच ग्रामस्थांच्या आग्रहाखातर मागच्या कित्येक महिन्यांपासून राहुल सोनवणे यांनी सर्कल पिंजून काढले आहे.
   दरम्यान प्रत्येक अडीअडचणीमध्ये धावून जाण्याच्या स्वभावामुळे सुखदुःखाच्या प्रसंगी राहुल सोनवणे यांची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी लागलेली आहे. अतिशय तत्पर आणि सामाजिक जाण असलेला चेहरा म्हणून सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणावर वातावरण तयार झालेले आहे. आणि योगायोगाने हे सर्कल खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने आता तर राहुल सोनवणे यांची दावेदारी निश्चित झालेली असून सर्कलमधील गावागावात नागरिक आनंद उत्सव साजरा करताना दिसत आहेत.

असे आहे बीड जिल्हा परषदेचे संपूर्ण आरक्षण

जिल्हा परिषद गट
१) रेवकी:सर्वसाधारण महिला
२) तलवाडा : सर्वसाधारण
३) जातेगाव :सर्वसाधारण
४) गढी :सर्वसाधारण
५) धोंडराई :सर्वसाधारण महिला
६) उमापूर : ओबीसी(महिला)
७) चकलांबा:ओबीसी
८) मादळमोही :सर्वसाधारण महिला
९) पाडळसिंगी:सर्वसाधारण

१०) केसापुरी : अनुसूचित जाती
११) गंगामसला :ओबीसी
१२) टाकरवण :सर्वसाधारण महिला
१३) तालखेड :अनुसूचित जाती
१४) पात्रुड :सर्वसाधारण महिला
१५) दिंद्रुड :सर्वसाधारण महिला

१६) उपळी: ओबीसी (महिला)
१७) चिखलबीड :सर्वसाधारण

१८) राजुरी:सर्वसाधारण महिला
१९) बहिरवाडी:सर्वसाधारण महिला
२०) पिंपळनेर:सर्वसाधारण
२१) नाळवंडी :सर्वसाधारण महिला
२२) पाली :सर्वसाधारण महिला
२३) नेकनूर: ओबीसी
२४) लिंबागणेश :सर्वसाधारण
२५) चौसाळा:सर्वसाधारण

२६) घाटशिळ पारगाव :सर्वसाधारण महिला
२७) रायमोहा :सर्वसाधारण
२८) पाडळी: ओबीसी(महिला)
२९) पिंपळनेर :सर्वसाधारण

३०) डोंगरकिन्ही: ओबीसी
३१) अंमळनेर :ओबीसी
३२) पारगाव घुमरा:सर्वसाधारण

३३) दौलावडगाव :सर्वसाधारण महिला
३४) धामणगाव:सर्वसाधारण
३५) धानोरा :सर्वसाधारण महिला
३६) लोणी (स) :सर्वसाधारण महिला
३७) कडा :सर्वसाधारण महिला
३८) मुर्शदपुर:सर्वसाधारण
३९) आष्टा ह ना. : सर्वसाधारण महिला

४०) विडा:सर्वसाधारण महिला
४१) येवता :ओबीसी( महिला)
४२) आडस : ओबीसी
४३) होळ :अनुसूचित जाती (महिला)
४४) चिंचोलीमाळी :ओबीसी(महिला)
४५) नांदुरघाट :ओबीसी(महिला)
४६) युसूफवडगाव :सर्वसाधारण

४७) तेलगाव :अनुसूचित जाती (महिला)
४८) भोगलवाडी : अनुसूचित जमाती
४९) आसरडोह :ओबीसी

५०) सिरसाळा :सर्वसाधारण
५१) पिंप्री :अनुसूचित जाती
५२) मा़डवा (परळी) :सर्वसाधारण महिला
५३) मोहा :अनुसूचित जाती
५४) जिरेवाडी :अनुसूचित जाती (महिला)
५५) धर्मापुरी : ओबीसी

५६)जोगाईवाडी :सर्वसाधारण
५७) घाटनांदूर :सर्वसाधारण महिला
५८) पट्टीवडगाव :सर्वसाधारण
५९) बर्दापुर :ओबीसी(महिला)
६०) चनई : ओबीसी(महिला)
६१) पाटोदा म. :अनुसूचित जाती (महिला)

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close