#Accident

काळवटी तलावात 15 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू……!

अंबाजोगाई दि. २६ – ( पांडुरंग केंद्रे) अंबाजोगाई शहरापासून जवळच असणाऱ्या काळवटी तलावात पोहत पोहत दुररवर  गेलेली वैष्णवी वशिष्ठ भोसले वय १५ ही मुलगी पाण्यात बुडाली. तिला तातडीने बाहेर काढून स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
                          वैष्णवी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंबाजोगाई शहर कार्यवाह वशिष्ठ भोसले यांची मुलगी होती. वशिष्ठ भोसले हे नेहमी त्यांच्या मुलांना घेऊन पोहण्यासाठी काळवटी तलावात जात असत. बुधवारी सकाळी देखील ते मुलगी वैष्णवी व मुलगा या दोघांना पोहण्यासाठी काळवटी तलावात घेऊन गेले होते. मुलीला चांगले पोहता येत असल्याने तिने पाण्यात उडी मारली मात्र पोहत पोहत तलावात दूरपर्यंत गेली असता दमल्यामुळे ती पाण्यात बुडाली असा अंदाज आहे. वैष्णवी बुडत असल्याने वशिष्ठ भोसले, कृष्णा लोखंडे व अन्य काही तरुणांनी तातडीने पोहत पोहत तिच्याकडे जाऊन तिला पाण्याबाहेर काढले. परंतु शरिरात पाणी गेल्याने वैष्णवी अत्यवस्थ झाली होती, तिला स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिथे डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता ती थोडा वेळ शुद्धीत आली आणि बोलली देखील होती.मात्र नंतर तिची तब्येत खालावली आणि तिचा मृत्यू झाला.                                                                 दरम्यान वैष्णवी नुकतीच ११ वीच्या वर्गात जाणार होती. शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रात अग्रेसर असलेल्या  गुणी मुलीच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close