क्राइम
पती पत्नीस मारहाण करत जीवे मारण्याची धमकी, केज पोलिसांत गुन्हा दाखल……!
केज दि.28 – तु आमच्या शेतात काय करतोस अशी कुरापत काढून शेतकऱ्यास चाबकाने आणि पत्नीस लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील खरमटा येथे घडली. याप्रकरणी केज पोलीसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील खरमटा येथील बाळासाहेब बोधल जाधव ( वय ५१ ) व त्यांची पत्नी हे दोघे २६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता शिवारातील शेतात होते. यावेळी आरोपी माणिक बोधल जाधव, संतोष रतन जाधव, सचिन माणिक जाधव, महेंद्र माणिक जाधव, दादाराव बोधल जाधव हे संगनमत करून आले. त्यांनी तू आमच्या शेतात काय करतोस अशी कुरापत काढून माणिक याने हातातील चाबकाने बाळासाहेब यांच्या पाठीवर मारहाण केली. इतरांनी ढेकळाने व लाथाबुक्याने बेदम चोप दिला. तर त्यांच्या पत्नीस ही शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद बाळासाहेब जाधव यांनी दिल्यावरून माणिक जाधव, संतोष जाधव, सचिन जाधव, महेंद्र जाधव, दादाराव जाधव या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सानप हे पुढील तपास करत आहेत.