#Lockdown

पुढील पंधरा दिवसांसाठी बीड जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर……! 

बीड दि. 1 – कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता दिनांक ०१.०६.२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून ते १५.०६. २०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंतच्या मार्गदर्शक सूचना बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी निर्गमित केले आहेत. तसेच दिनांक ०१.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपासून ते १५.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० या दरम्यान केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
                  यामध्ये  सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सैनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत. दूध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील. तर दि.०७.०६.२०२१ ते १५.०६.२०२१ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना (किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्की, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी संबंधित इ.) केवळ सकाळी ०७.०० ते सकाळी ११.०० या वेळेत चालू राहतील व शनिवार, रविवार पूर्णपणे बंद राहतील.  गॅस वितरण दिवसभर सुरु राहील, जिल्ह्यातील सर्व बैंक/ ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज दि. ३१.०५.२०२१ पासून शासनाच्या नियमीत वेळेप्रमाणे
पूर्णवेळ सूरु राहतील. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे २५% उपस्थितीत सुरु राहतील. (ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल.)
 लसीकरणा करीता ४५ वर्षावरील ज्या व्यक्तींना मेसेज आला आहे / आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल. (लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पत्र, आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल.
तसेच कृषी व्यवसायाशी संबंधित बि-बियाणे, खते, औषधे यांची जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले बि-बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल. तसेच कृषि विक्रेत्यांना शेतकऱ्यांना वि बियाणे, खते, औषधे विक्रीस खरेदीस पूर्णवेळ सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत परवानगी असेल. (शनिवार व रविवार सुध्दा विहीत वेळेत चालू राहतील.) कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० या वेळेतच सुरु राहतील. नरेगाची कामे सुरु राहतील. त्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सैनिटायझर चा व कोविड १९ विषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल.
                   जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांना सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. (राशनसाठी जाणा-या व्यक्तींच्या सोबत राशनकार्ड, आधार कार्ड असणे आवश्यक आहे.) १२. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णपणे बंद राहतील. दुकानांना पुरवठा केल्या जाणान्या वस्तूंच्या वाहतूकीवर निर्बंध असणार नाहीत, परंतु दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमाचा भंग केल्यास सदर दुकान कोरोना साथ अधिसूचना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल व दिनांक १२.०५.२०२१ च्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे दंड आकारण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close