
केज दि.1 – जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघा बापलेकांनी घरात घुसून तरुणाच्या डोक्यात चाकू मारून जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील उंदरी येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
उंदरी येथील अक्षय अंबादास घोडके ( वय २१ ) व त्याची आई ३० मे रोजी दुपारी ३ वाजता घरी असताना जुन्या भांडणावरून बाबासाहेब बन्सी सोनवणे, निलेश बाबासाहेब सोनवणे हे दोघे बापलेक त्यांच्या घरात घुसले. बाबासाहेब याने अक्षयला खाली पाडले. तर निलेशने हातातील चाकू अक्षयच्या कानाजवळ डोक्यात मारला. अक्षयची आई भांडण सोडविण्यास आली असता त्यांना ही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. अक्षय घोडके याच्या फिर्यादीवरून बाबासाहेब सोनवणे, निलेश सोनवणे या दोघा बापलेकांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार साठे हे पुढील तपास करत आहेत.