क्राइम
हिंगोली जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा केज तालुक्यात घेतला ताब्यात……!
केज दि.१ – हिंगोली जिल्ह्यातून अज्ञात कारणासाठी अपहरण करून पळवून आणलेल्या एका अल्पवयीन मुलीला व तिचे अपहरण करणाऱ्या युवकास हिंगोली पोलीसांनी केज तालुक्यातील एका गावातून ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, दि. २९ मे रोजी हिंगोली येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादी नुसार हिंगोली (ग्रामीण) पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२२/२०२१ भा.दं.वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल होताच तपासी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक एस. टी. गोहाडे यांनी तपास करून संशयिताचे मोबाईल लोकेशन व व कॉल डिटेल्स याच्या आधारे बीड जिल्ह्यातील केज गाठले. अल्पवयीन मुलगी व तिचे अपहरण करणारा संशयित हा केज तालुक्यातील काशीदवाडी येथे असल्याची पक्की खात्री होताच; तपासी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक एस.टी. गोहाडे व पोलीस नाईक चव्हाण यांनी केज पोलीसांच्या मदतीने काशीदवाडी येथून भरत थोरात (रा. मांगवडगाव, मूळ गाव ढाकेफळ) ता. केज यास अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले आहे.
सदर प्रकरणी हिंगोली (ग्रामीण) पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.टी. गोहाडे हे पुढील तपास करीत आहेत.