तलाठी फजल फरीद शेख यांचे केज शहरातील कळंब रस्त्यावर संतोष हॉटेलच्या समोर घर आहे. तलाठी शेख हे घराला कुलूप लावून एका कार्यक्रमाला गेले होते. २ जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याची संधी साधून घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील लॅपटॉप, कानातील सोन्याची रिंग तर हॉलमधील एलईडी, पितळी भांडे असा ४२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. फजल शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक उमेश आघाव हे पुढील तपास करत आहेत.
आपण बाहेरगावी असल्याचे फोटो सोशल मीडिया वर टाकलेले पाहुन चोरट्यांना संधी सापडते.