#mission begin again#Unlock

बीड जिल्हा तिसऱ्या लेव्हल मध्ये, जाणून घ्या यामध्ये काय राहणार सुरू तर कशावर आहेत निर्बंध…..! 

बीड दि.५ – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये राज्यातील कोरोना संसर्गाची टक्केवारी पाहून पाच लेव्हल निश्चित केल्या असून सोमवार पासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याचे ठरवले आहे. यामध्ये 3 जूनच्या आकडेवारीनुसार बीड जिल्हा तिसऱ्या टप्प्यात येत असल्याने कांहीसे निर्बंध हटवले जाणार आहेत. परंतु स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन अन लॉक संदर्भात ज्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मार्गदर्शक सूचना जाहीर करतील.

यामध्ये अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के दुपारी 2 पर्यंत खुले राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल.मात्र ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मॉर्निंग वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 50 टक्के क्षमतेने खाजगी आणि शासकीय कार्यालये सुरू असतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार आहेत मात्र हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी  2 पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

दरम्यान तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close