हवामान
केज शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी…….!

केज दि.५ – काल अंबाजोगाई परिसरात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज दि.५ रोजी केज शहर आणि परिसरात दुपारी एक च्या सुमारास दमदार सरी बरसल्या. मान्सून चे आगमन अद्याप झालेले नसले तरी मागच्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कांही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी हालचाल सुरू झाली आहे. खते बी बीयाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी लगबग करत आहेत.परंतू हा पाऊस मान्सून पूर्व असल्याने शेतकरी मान्सून च्या प्रतीक्षेत आहेत.