#Social

मातंग समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य आत्माराम चांदणे यांनी केले – ऍड. कारके……! 

गेवराई दि. ५ – तालुक्यातील डीपीआयच्या वतिने स्मृतिशेष आत्माराम चांदणे यांची जंयती शहरातील मातंग स्मशान भुमित बोद्धी वृक्ष लाऊन साजरी करण्यात आली. यावेळी मातंग समाजाला योग्य दिशा देण्याचं काम आत्माराम चांदणे यांनी केले असल्याचे प्रतिपादन ऍड.सोमेश्वर कारके यांनी केले. शहरातील डीपीआय च्या तालुका कार्यालयात अभिवादन करतांना कारके बोलत होते.
             यावेळी तालुका अध्यक्ष संजय सुतार, महादेव भिसे, सय्यद माजेद, अमोल सुतार, अक्षय सुतार, विजय सुतार, अर्जून सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. समस्त महाराष्ट्रात मातंग समाजानी तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेवर मातंग समाजाने चालले पाहीजे. समाजाला निळ्या झेंड्याखाली आल्याशिवाय पर्याय नाही म्हणुन स्वत: धम्माची दिक्षा घेत मातंग समाजासमोर शांतीचा मार्ग ज्यांनी सांगितला अश्या भगवान बुद्ध व राज्यघटनचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या जिवन मार्गावर चालल्याने आपली प्रगती होईल. त्यांचे विचार आपण तळागळा पर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत असेही कारके यांनी सांगितले.
                  यावेळी अमोल कारके, साईनाथ सुतार, आबा भिसे, नामदेव भिसे, सचिन धुंरधरे, आकाश सुतार, सुरेश सुतार, शांतीलाल सुतार, विशाल सुतार, अविनाश आव्हाड, जिंतेद्र रोकडे, अभिजीत शिंदे  यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्तिथ होते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close