केज तालुक्यातील तुकूचीवाडी येथील शेतकरी रामदास काशीनाथ चौरे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाजवळ जनावरे बांधली होती. शनिवारी दुपारी २.४० वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसात लिंबाखाली बांधलेल्या म्हैशीच्या अंगावर वीज पडल्याने म्हैस जागीच मरण पावली. तर इतर जनावरे सुदैवाने बजावली. त्यामुळे शेतकरी रामदास चौरे यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी मंडळ अधिकारी बाळासाहेब फरके, तलाठी आशा मुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर शेतकऱ्यास तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.