क्राइम

वयस्कर पत्नीला मारहाण करून ‘तो’ बाबा गेला वारीला…….!

ठाणे दि.७ – सोशल मीडियामुळे अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आहेत तर अनेक अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे कामसुद्धा सोशल मीडिया करत असते. आपल्याला अनेक वेळा सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडिओ पाहायला मिळत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सदरील व्हिडिओ कल्याण तालुक्यातील द्वारली या गावामधील आहे. या गावातील स्वतःला बुवा आणि महाराज समजणाऱ्या गजानन चिकणकर याने आपल्या पत्नीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या व्यक्तीला दोन बायका असून तो भक्तांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत प्रबोधन करत असतो. त्याची पहिली पत्नी वयस्कर असल्याने त्या काम करत नसल्याने तो अनेकदा आपल्या पत्नीला मारहाण करत असतो. हा व्हिडिओ त्या बुवाच्या नातवानेच व्हायरल केला आहे.हा व्यक्ती आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करत असताना आजबाजूला इतरही अनेक महिला आहेत, मात्र कोणीही या महिलेच्या मदतीला आले नाही. हा व्यक्ती महिलेला वारंवार परत असं करशील का? असा सवाल करत लाथेने तसेच हातात बादली घेऊन मारताना दिसत आहे. तर हा व्यक्ती एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने महिलेला हाताला धरुन ओढत भिंतीवर आदळून तिला घरातून बाहेर काढण्यासाठी तो खुर्चीवरून खाली ओढत असल्याचे दिसत आहे. या सगळ्या मारहाणीत त्या महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. व्हिडिओमध्ये ही महिला वयस्कर असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताच मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीवर काही कारवाई होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान सदरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या घरी धाव घेतली असता तो बाबा आळंदीला वारीला गेल्याचे सांगण्यात आले. परंतु पत्नीने तक्रार न दिल्याने त्याला समज देण्यात येणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close