नवी दिल्ली दि.१० – इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने 10 हजार पेक्षा जास्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या व्हॅकन्सी अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) कार्यालय सहायक- मल्टीपर्पज (क्लर्क) आणि ऑफिसर स्केल- I (PO), ऑफिसर स्केल II आणि III साठी 10466 पदांवर उमेदवारांची भरती करणार आहे. योग्य उमेदवार आजपासून या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या अधिकृत नोटिफिकेशन (लिंक) च्या आधारावर अर्जाची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.
ऑनलाइन अर्जाची सुरुवात 08 जून 2021 असून ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अखेरची तारीख – 28 जून 2021 आहे.तर अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख- 28 जून 2021आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी कॉल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख (प्रारंभिक)- जुलै/ऑगस्ट 2021 तर ऑनलाइन परीक्षेची तारीख (प्रारंभिक), ऑनलाइन परीक्षेच्या निकालाची घोषणा (प्रारंभिक)- सप्टेंबर 2021,ऑनलाइन परीक्षेसाठी कॉल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख (मेन्स/सिंगल)- सप्टेंबर 2021, ऑनलाइन परीक्षा (मेन्स/सिंगल) (BPS RRB PO Mains Exam)- सप्टेंबर/ऑक्टोबर 2021 आहे.
यामध्ये ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी 5096 पदे, ऑफिसर स्केल 1 (असिस्टंट मॅनेजर) साठी 4119 पदे, ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) साठी 1100 पदे,ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) साठी 151 पदांचा समावेश आहे. तर वयोमर्यादा
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत, ऑफिसर स्केल 1 (असिस्टंट मॅनेजर) साठी 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत, ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) साठी 21 वर्ष ते 32 वर्षापर्यंत, ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) साठी 21 वर्ष ते 40 वर्षापर्यंत निश्चित केली असून वयाची गणना 1 जून, 2021 च्या आधारावर होईल.
तसेच ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) साठी – 7200 रुपये प्रति महिना ते 19300 रुपये प्रति महिनापर्यंत, ऑफिसर स्केल 1 (असिस्टंट मॅनेजर) साठी – 14500 रुपये प्रति महिना ते 25700 रुपये प्रति महिनापर्यंत,ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) साठी – 19400 रुपये प्रति महिना ते 28100 रुपये प्रति महिनापर्यंत, ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) साठी – 25700 रुपये प्रति महिना ते 31500 रुपये प्रति महिनापर्यंत वेतन निश्चित केले आहे.
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस वर्गासाठी – 850 रुपये, एस/एसटी/पीडब्ल्यूडी वर्गासाठी – 175 रुपये अशी फीस आहे.
ऑनलाइन अर्ज करताना सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन
होमपेजवरील CRP RRBs सेक्शनमध्ये जावे लागेल. येथील लिंकवर क्लिक करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
दरम्यान IBPS RRB X Notification 2021 च्यानुसार उमेदवारांची निवड प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारावर होईल. अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन डायरेक्ट अर्जासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.
जाहिरात pdf साठी खाली क्लिक करा
http://bit.ly/3uWr8Cw
nakatebalaji6@gmail.com