महाराष्ट्र

कुठल्याही परिस्थितीत वीज बिल माफ होणार नाही……!

औरंगाबाद दि.११ – गरज पडली तर सवलत दिली जाईल, मात्र वीजबिल माफ होऊ शकत नाही. सार्वजनिक कंपन्या चालवण्याला पैसे लागतात, त्यामुळं वीज बिल भरावं लागेल, वीज बिल माफ करण्याचं काम केंद्र सरकारचं आहे, केंद्र सरकारने मदत केली तर राज्य सरकारही पुढं येईल, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.गाव तांडे जे विजेपासून वंचित आहेत, तिथं वीज पोहोचवण्याचं काम आम्ही हातात घेतोय. काही ठिकाणी पोहोचणं कठीण आहे, मात्र आम्ही धोरण ठरवलं आहे, त्यानुसार वीज देऊ, असा निर्धार नितीन राऊतांनी व्यक्त केला आहे.

आता नवीन औष्णिक प्रकल्प नाही, जे आहेत ते सुरू राहतील. पुढं औष्णिक प्रकल्प नाही. सौर ऊर्जेवर जोर देऊया त्यातून फायदा होईल, रोजगार मिळेल, असा विश्वासही नितीन राऊतांनी व्यक्त केला.

दरम्यान,गुप्त बैठकीचे अनेक सूर असतात, हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे. तिन्ही पक्ष सोबत काम करतील, सरकार पडणार नाही. आम्ही पूर्ण काम करणार, जोरात करणार, आम्ही एक आहोत म्हणून चांगलं काम होतंय, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close