#Accident
केज अंबाजोगाई रोडवर अपघात, शिक्षिका ठार……!

केज दि.११ – तालुक्यातील भाटुंबा येथील रहिवाशी अशोक धपाटे (ह.मु. उमरी रोड केज) हे त्यांच्या पत्नीसह दुपार च्या दरम्यान भाटुंबा येथून केजकडे मोटारसायकल वर येत असताना भाटुंबा फाट्याजवळ टेम्पो आणि मोटारसायकल च्या अपघातात दोघेही जखमी झाले होते. यामध्ये अशोक धपाटे यांच्या पत्नी अश्विनी धपाटे -शेळके (शिक्षिका, कुंबेफळ ता. केज )यांचा मृत्यू झाला असून माजी सैनिक अशोक धपाटे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर दोघांनाही अंबाजोगाई येथे हलवण्यात आले मात्र अश्विनी धपाटे यांचा मृत्यू झाला. तर अशोक धपाटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान सदर अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून युसुफ वडगाव पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
