#Accident

रखडलेल्या कामामुळे कार कोसळली खड्ड्यात…..चौघांचा दुर्दैवी अंत……!

 

हिंगोली दि.१४ – हिंगोलीच्या राज्य महामार्गावर घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सेनगावनजीक हा प्रकार घडला. या मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मात्र, या पूलाचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. या पुलासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता.

हा खड्डा महामार्गावरच असूनही त्याठिकाणी कोणताही धोक्याचा फलक लावण्यात आला नव्हता. त्यामुळे कार थेट या खड्ड्यात जाऊन कोसळली. हा खड्डा पाण्याने भरलेला होता. त्यामुळे पाणी थेट गाडीतील लोकांच्या नाकातोंडात गेले. परिणामी सर्वांचा मृत्यू झाला.चौघेही मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा येथील रहिवासी आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close