साळेगाव येथील अशफाक नवाब सय्यद हे शहरातील समता नगर भागात वास्तव्यास असून ते १५ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मंगळवार पेठेतील बाजारात भाजीपाला करीत होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील १९ हजार ९९९ रुपयांचा मोबाईलसह मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलेली दोन हजार रुपयांची नोट, आरसी बुक, लायसन्स, आधार कार्ड लंपास केले. अशफाक सय्यद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे पुढील तपास करत आहेत.