#Job

युवा कौशल्य विकास योजनेत सामील होण्यासाठी युवकांना फी देण्याची गरज नाही……!

नवी दिल्ली दि.१९ – देशातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 2015 मध्ये स्किल इंडिया मिशनची (Skill India Mission) सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत दरवर्षी देशातील सुमारे 24 लाख तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण (स्किल इंडिया मिशन जॉब) प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले गेलं होतं. स्किल इंडिया मिशनचा उद्देश देशभरातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योग संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते स्वत:चा रोजगार सुरू करू शकतील. या योजनेंतर्गत, दहावी-बारावीमध्ये ज्यांनी शाळा सोडून दिलीय किंवा कमी शिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाते.

स्किल इंडिया मिशन अंतर्गत, युवा कौशल्य विकास योजनेत सामील होण्यासाठी युवकांना फी देण्याची गरज नाही. उमेदवार तीन महिने, सहा महिने किंवा एका वर्षाच्या कोर्ससाठी नोंदणी करू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते, जे देशभरात वैध असते. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी रोजगार मेळाव्यातून मोठी मदत होते. सरकार यामधून बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठीही प्रयत्नशील आहे.आंतरराष्ट्रीय स्तरांनुसार प्रशिक्षण दिलं जावं, असा सरकारचा आग्रह आहे. जेणेकरुन दरवर्षी तरुणांना वर्क फोर्समध्ये समाविष्ट केले जावे. (स्किल इंडिया मिशन बेनिफिट्स) या योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फर्निचर व फिटिंग्ज, हस्तकला तसंच चामड्याचा उद्योग अशा सुमारे 40 तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.

या योजनेला राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान असंही म्हणतात. या योजनेचा उद्देश तरुणांना रोजगार मिळवून देणे तसंच ते स्वत: इतरांनाही रोजगार देऊ शकतात, एवढं त्यांना सक्षम करणं हा आहे. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून दर पाच वर्षांत कौशल्य प्रशिक्षण देऊन एक कोटीहून अधिक लोकांना स्वावलंबी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याला स्किल इंडिया मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर pmkvyofficial.org भेट द्यावी लागेल.यानंतर, फाइंड ट्रेनिंग सेंटरचा पर्याय येईल, त्यावर क्लिक करा.नंतर दुसर्‍या पेजवर आपल्याला कोणत्या क्षेत्रात प्रशिक्षण घ्यायचे आहे ते निवडावे लागेल.त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close