क्राइम

मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू, वडिलांची प्रकृती चिंताजनक…….!

शिरूर कासार दि.२० – तालुक्यातील  घाटशिळ-पारगाव येथे हृदयाला पिळवटून टाकणारी घटना रविवारी सकाळी समोर आली आहे.मुलाने केलेल्या मारहाणीत जन्मदाती आईचा मृत्यु झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत.फादर्स डेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

                        शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीची ही घटना घडत असतानाचा गावातील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला आहे. त्यानंतर रविवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाटशिळ पारगावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेतून बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर आला आहे.

                    दरम्यान या मारहाण प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.बाबासाहेब खेडकर हा काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण करतानाचे दृश्य या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कृत्य तो सतत अधून मधून करत असतो असे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर यांचा मृत्यू झाला आहे. तर वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close