आपला जिल्हा
शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाच्या अंगावर वंगण फेकल्यावरून, दोन गटात तुंबळ राडा

माजलगाव दि.२४ – दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अप्पासाहेब जाधव यांची निवड झाली होती. या निवडीचा निषेध शिवसेनेचे शहर प्रमुख पापा सोळंके यांनी नोंदवला होता. तर आज जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांची माजलगाव येथे मिरवणूक सुरु असताना सोळंके गटाकडून वंगण फेकण्याचा प्रयत्न झाल्याने दोन्ही गटात तुंबळ राडा झाला. यामध्ये पापा सोळंके जखमी झाले असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.